डीकेटीईच्या ५१ विद्यार्थ्यांची टीसीएस कंपनीत निवड

इचलकरंजी: विजय मकोटे   

      दि. २८ : नोकरीच्या क्षेत्रात आय.टी. कंपन्यांचा दबदबा आहे. टीसीएस ही माहीती तंत्रज्ञान सेवा आणि आउटसोर्सीग सेवा पुरवठा या क्षेत्रात काम करणारी भारतातील सर्वात मोठी सॉफटवेअर कंपनी आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये झालेल्या टीसीएस निंजा – डिजीटल टेस्ट ही भारतात सर्वत्र एकाच दिवशी घेतली गेली आणि फायनल इंटरव्हयू मधून डीकेटीई संस्थेच्या ५१ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या निवडीमुळे नामांकित कंपन्यामध्ये प्लेसमेंटमध्ये डीकेटीईने पुन्हा एकदा मोठी बाजी मारली आहे.

संस्थेमध्ये इंटरव्हयूच्या तयारीसाठी प्रत्येक विभागामध्ये खास प्रशिक्षण वर्ग घेतले जातात.तसेच विद्यार्थ्यांच्या तयारीकडे विशेष लक्ष दिले जाते.त्यामुळे सुरुवातीला असलेल्या अ‍ॅप्टीटयूट टेस्टमध्ये या तयारीचा खूप उपयोग झाला व ५१ विद्यार्थी सिलेक्ट झाले. सध्या इंजिनिअरींग क्षेत्रात जोरदार स्पर्धा असल्याकारणाने यश मोठे मानले जाते आहे. या प्लेसमेंटसाठी इंजिनिअरींग विभागाचे टीपीओ प्रा.जी.एस. जोशी यांनी परिश्रम घेतले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे ः-
कॉम्प्युटर विभागामधूनः सिध्दार्थ मोरे, सोहन सुतार, प्रियेश शेटटी, सुयश फाटक, गुंजन राजगुरे, संध्या पाटोळे, सोहेल फरास, मेहवीश शेख, हुजेफा मोमीन, श्‍वेता कांबळे, मनमोहन शेखावत. मेकॅनिकल विभागामधून ः अशोक माळी, अलिम बहादूर, सिध्दांत चौगुले, अनघा चव्हाण, सम्मेद किणींगे, मंगेश माळी, मंथन चौगुले, श्रेयश जाधव, दर्शन पाटील, केदार नलवडे, प्रथमेश कवठेकर, जयेश अग्रवाल. इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड टेलिकम्युनिकेशन विभागामधून ः पूजा पाटील, अनिकेत ऐनापुरे, वासिम बेग, तेजस्वीनी झगडे, रेवती गुरव, हर्षल वायचळ, अमृता पाटील, दिप्ती वर्धमाने, अभिषेक नंदगावे. आयटी विभागामधून ः स्नेहल पवार, अंजली पाटील, सुश्मिता दानवाडे, मकरंद सहस्त्रबुध्दे, संकल्प वरदान, सुजय पाटील, नेहा भोजे, विदया लोहार, ओंकार माळी, निखिल यमगर्णीकर, कुंजन चव्हाण, श्रुती मंडपे. इलेक्ट्रॉनिक्स विभागामधून ः भागर्वी महाजन, अंकिता सावंत, समिक्षा शेटे, स्नेहल पाटील, साहिल डांगरे.
विद्यार्थ्यांच्या यशाबददल डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे,आमदार प्रकाश आवाडे, ट्रेझरर आर व्ही केतकर,मानद सचिव डॉ सपना आवाडे व सर्व विश्‍वस्त यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना संस्थेचे संचालकप्रा.डॉ.पी.व्ही.कडोले,उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे.पाटील,उपसंचालिकाप्रा.डॉ.सौ.एल.एस.अडमुठे,विभागप्रमुख डॉ. डी.व्ही. कोदवडे, विभागप्रमुख डॉ.व्ही.आर. नाईक, विभागप्रमुख डॉ.एस.ए. पाटील त्याचबरोबर सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.