इचलकरंजी महानगरपालिकेत बाळशास्त्री जांभेकर जयंती उत्साहात साजरी

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी

दि.२१: बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवार दि. २० फेब्रुवारी रोजी महानगरपालिका सभागृहात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी महापौर उदय धातुंडे आणि आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमास सभागृह नेते विठ्ठल चोपडे, नगरसेवक योगेश पाटील, मुख्य लेखापरीक्षक आरती खोत, सहा आयुक्त नितिन बनगे, संदीप जोशी तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मान्यवरांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारिता, सामाजिक प्रबोधन व शिक्षण क्षेत्रातील कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.