चलकरंजी महापालिकेच्या महिला महोत्सवाला शहरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

इचलकरंजी: विजय मकोटे 

दि.१० : जागतिक महिला दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आयोजित महिला महोत्सव २०२६ अंतर्गत विविध स्पर्धा व कार्यक्रमांना शहरातील महिलांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. महिलांच्या कला-कौशल्याला व व्यक्तिमत्त्व विकासाला वाव देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि.९ मार्च रोजी रांगोळी स्पर्धा, ‘जोडी तुझी माझी’ तसेच होम मिनिस्टर या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांमध्ये शहरातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

           होम मिनिस्टर स्पर्धेत मेघा उत्तुरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. मिताली बोंगारडे यांनी द्वितीय तर पुनम मगदुम यांनी तृतीय क्रमांक मिळविला.  रांगोळी स्पर्धेत सुमारे १२ महिला व युवतींनी सहभाग घेत आकर्षक व कलात्मक रांगोळ्या साकारल्या. पाककला स्पर्धेत तब्बल २५ महिलांनी सहभाग घेत विविध स्वादिष्ट पदार्थ सादर केले. याशिवाय ग्रुप डान्स स्पर्धेत तीन महिला गटांनी तर सोलो डान्स स्पर्धेत तीन महिलांनी सहभाग घेतला.

         या सर्व स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांना मंगळवार रोजी पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.दरम्यान, बुधवार दि.११ मार्च रोजी महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, स्पॉट गेम्स तसेच मुलींच्या कुस्तीच्या भव्य मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी शहरातील सर्व महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.