“मणेरे शैक्षणिक संकुलातील चि.श्लोक बन्ननावरने रचला इतिहास

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी

दि.८: श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई प्राथमिक विद्यामंदिर, इचलकरंजी येथील विद्यार्थी चि.श्लोक शिवानंद बन्ननावर याने बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ मार्फत घेण्यात आलेल्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत ब्रॉन्झ मेडल मिळवून नेत्रदिपक यश संपादन केले. त्याच्या या यशाबद्दल शाळेने आज इचलकरंजी व कबनूर परिसरात झांज पथक व लेझीमसह श्लोक व त्याच्या पालकांची भव्य मिरवणूक काढून सत्कार केला.

संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. शितलकुमार मणेरे यांनी श्लोकचे कौतुक करत अशा यशस्वी विद्यार्थ्यांमुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावत असल्याचे म्हटले. तर संस्थेचे सेक्रेटरी मा. श्री. अनिलकुमार मणेरे यांनी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत ब्राँझ मेडल मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला, असे उद्गार काढले. संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. सुभाष केटकाळे यांनी श्लोकच्या पुढील शैक्षणिक व वैज्ञानिक वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे समन्वयक श्री. अशोक वसगडे सर यांनी श्लोकने बालवैज्ञानिक म्हणून मिळवलेली ओळख ही त्याच्या उज्वल भविष्यासाठी एक भक्कम पाऊल आहे, असे म्हणत त्याचे कौतुक केले. विज्ञान शिक्षक श्री. खोत सर यांनी लहान वयातच वैज्ञानिक दृष्टीकोन व जिद्दीच्या जोरावर श्लोकने हे यश संपादन केल्याचे सांगितले. उपस्थित मान्यवरांनी श्लोकच्या यशाचे भरभरून कौतुक करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. श्लोकच्या आईने आपल्या मनोगतात पाल्याच्या यशात संस्थेचे, शाळेचे, शिक्षकांचे फार मोठे सहकार्य लाभले, याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच श्लोकच्या मेहनतीचा विशेष उल्लेख करून इतर विद्यार्थ्यांनीही त्याच्याकडून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. आज श्लोकची ओळख ‘बालवैज्ञानिक’ म्हणून होत असल्याचा अभिमान व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. शितलकुमार मणेरेसो, सेक्रेटरी मा. श्री. अनिलकुमार मणेरेसो, उपाध्यक्ष मा. श्री. सुभाष केटकाळेसो, तसेच संस्थेचे समन्वयक श्री. अशोक वसगडे सर आणि सौ. कुसुमताई प्राथमिक विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. पुष्पा ऐनापूरे मॅडम, मणेरे हायस्कूल ॲण्‍ड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सौ. वैशाली मंगसुळे मॅडम, कुसुम ऑलिम्पियाड विभागप्रमुख श्री. शैलेश कांबळे सर, सौ. कुसुमताई बालमंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती ढेकळे मॅडम हे सर्व मान्यवर उपस्थित होते.यावेळी श्लोकला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक व पालकांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. निवास तोडकर सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. वैशाली पाटील मॅडम यांनी केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.