डीकेटीईच्या विद्यार्थ्यांना कर्नाटक येथील राष्ट्रीय स्तरावरील हॅकॅथॉनमध्ये द्वितीय क्रमाकांचे बक्षिस
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.२४ः डीकेटीईच्या बी.टेक. तृतीय वर्षातील सीएसई एआय अॅण्ड एमएल व एआयडीस मधील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखन्नीय यश संपादन करीत रीकॉन १.० हॅकॅथॉन या प्रतिष्ठीत स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविले आहे. कर्नाटकातील रुरल इंजिनिअरींग कॉलेज, हलकोटी यांच्या वतीने आयोजित या २४ तासांच्या या राष्ट्रीय हॅकाथॉनमध्ये देशभरातील अग्रगण्य अभियांत्रिकी संस्थाचे संघ सहभागी झाले होते.
बापूराव कुंडले, सौरभ कुलकर्णी, जतिन दायमा, पावडी कनल या विद्यार्थ्यांच्या संघाने उच्च दर्जाची नवोन्मेषी दृष्टी, परिपक्व तांत्रिक कौशिल्ये आणि प्रभावी संघकार्य यांचे उत्कृष्ट प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक मिळविला. मर्यादित कालावधीत अभिनव, व्यवहार्य आणि परिणामकारक उपाययोजना सादर करण्याच्या त्यांच्या क्षमतेने परिक्षकांची विषेश दाद मिळविली. विद्यार्थ्यांना एआय इन्व्हेन्टरी फोरकास्टींग सिस्टीम या विषयावार प्रकल्प सादर करत कॉम्पुटर विज्ञान, प्रोग्रॅमिंग व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने नवोन्मेषी, उद्योगाभिमुख व परिणामकारक दृष्टीकोन प्रभावीपणे मांडला. त्यांच्या उच्च दर्जाच्या सादरीकरणाने उपस्थित तज्ञ व परिक्षकांना प्रभावित करीत डीकेटीईच्या उत्कृष्ट तांत्रिक शिक्षणपध्दती, संशोधनाभिमुखता व नवकल्पनाशीलतेची ठळक छाप उमटवली.
या हॅकाथॉनमध्ये देशातील नामांकित संस्थांतील विद्यार्थी व उद्योग क्षेत्रातील तज्ञांचा थेट सहभाग असल्याने स्पर्धेची पातळी अत्यंत उच्च होती. डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे कौशल्य आणि नाविण्यपूर्ण उपयांसह देशातील सहभागी झालेल्या टीम्स मध्ये द्वितीय स्थान पटकविले.डीकेटीईमध्ये विद्यार्थ्यांना अशा राष्ट्रीय स्तरावरील हॅकेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले जाते. अनुभवी प्राध्यपकांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि उद्योगाभिमुख कार्यशाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची सर्वांगीण तयारी केली जाते. याच भक्कम शैक्षणिक पायाभरणीमुळे डीकेटीईचे विद्यार्थी देशभरात आपली गुणवत्ता सिध्द करीत आहेत.
डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे,मानद सचिव डॉ.सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच इन्स्टिटयूटच्या संचालिका प्रा.डॉ.एल.एस.आडमुठे, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे.पाटील, विभागप्रमुख डॉ.एस.के.शिरगावे व डॉ टी.आय.बागबान यांचे मार्गदर्शन लाभले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.