मणेरे शिक्षण संकुलनात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

इचलकरंजी: प्रतिनिधी

दि.०१: श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कु. सुमताई बाल मंदिर, प्राथमिक विद्यालय व मणेरे हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

     या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. सुभाष के. टकाळे उपस्थित होते. तसेच संस्थेचे समन्वयक मा. श्री. अशोक नसगडेसर यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात ध्वजपूजन व ध्वजारोहणाने करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष श्री. टकाळे यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत राज्याच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले.महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून विद्यालयातील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. शिल्पा करपे यांनी केले.या कार्यक्रमास हायस्कूल व कॉलेजच्या प्राचार्या सौ. वैशाली मंगसुळे, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सौ. पुष्पा ऐनापुरे, सर्व विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.