जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
सांगली: अय्यान पटेल
दि.१ : महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत गायन करण्यात आले.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी, तहसिलदार व विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.