डायनॅमिक स्पाेर्टस्च्या श्रध्दा धुमाळ हिची निवड

इचलकरंजी: विजय मकोटे
दि.७: नागपूर येथे आयाेजित छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेसाठी खुल्या महिला गटात येथील डायनॅमिक स्पाेर्टस् क्लबच्या कु. श्रध्दा अनिल धुमाळ हिची निवड झाली आहे.
     कु. श्रध्दा धुमाळ हिने आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे. तिच्या या कामगिरीची दखल घेऊन तिची या स्पर्धेसाठी राज्य संघात निवड झाली आहे. तिला प्रशिक्षक शेखर शहा यांचे मार्गदर्शन आणि डायनॅमिक स्पाेर्टस क्लबचे अध्यक्ष संजय कुडचे, भूषण शहा, अतुल बुगड, माेहसीन बागवान यांचे प्राेत्साहन लाभत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.