सन्मती बँकेस दिलेला चेक न वटल्या प्रकरणी एकास तीन महीने कैद व दंड

इचलकरंजी: विजय मकोटे 
दि.२० : येथील सन्मती सहकारी बँकेला कर्जाच्या अंशत: परताेडी पाेटी दिलेला चेक न वटल्याप्रकरणी कर्जदार मिरासाहेब गुलाब मुजावर (रा. चंदूर) यांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दाेषी ठरवून तीन महिन्यांची साधी कैद अशी सुनावली. तसेच िफर्यादी बँकेस नुकसान भरपाई म्हणून६०  हजार रुपये इतकी रक्कम दंड देण्याचा आदेश केला आहे.
मिरासाहेब मुजावर यांनी २०१९  मध्ये सन्मती बँकेच्या रुई शाखेकडून ६०  हजार रुपये इतके जामीनकी कर्ज घेतले हाेते. या कर्जाची त्यांनी ठरलेल्या शर्ती व अटी प्रमाणे परतेड न केल्याने कर्जखाते थकीत झाले हाेते. सदर कर्जाचे परतेडी पाेटी त्यांनी दिलेला चेक खात्यात पुरेसे पैसे नसल्याने न वटता परत आला हाेता. कर्जबाकी मान्य करून चेक दिलेला नाही तर कर्ज मंजुर करताना सिक्युरीटी पाेटी घेतलेल्या काेèया चेकचा गैरवापर बँकेने केला असल्याचे त्यांचे म्हणणे हाेते. परंतु न्यायालयाने सदर म्हणणे ेटाळून लावत मुजावर यांना तीन महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली. तसेच िफर्यादी बँकेस नुकसान भरपाई म्हणून ६०  हजार रुपये इतकी रक्कम दंड देण्याचा आदेश केला असून रक्कम न दिलेस ३०  दिवसांची साधी कैद असेही निकालात म्हटले आहे.
          याकामी बँकेर्ते अ‍ॅड. संजय गजबी यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. आकांक्षा लाहाेटी, अ‍ॅड. रिध्दी संजय गजबी यांनी सहकार्य केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.