केएटीपी संस्थेची निवडणूक बिनविरोध चेअरमनपदी प्रकाश दत्तवाडे; व्हा.चेअरमनपदी बाळासाहेब कलागते
दि.१२: येथील कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप इंडस्ट्रीयल इस्टेट अॅन्ड इंट्रीग्रेटेड टेक्स्टाईल पार्क या संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केली. तर निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नुतन संचालक मंडळाच्या बैठकीत संस्थेच्या चेअरमनपदी प्रकाश ज्ञानबा दत्तवाडे आणि व्हाईस चेअरमनपदी बाळासाहेब गणपती कलागते यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
अद्ययावत अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या या टेक्स्टाईल पार्कची सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे व संस्थापक माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडेे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची घोडदौड सुरु आहे. अत्यंत महत्वाकांक्षी असा प्रकल्प असलेल्या या कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप इंडिस्ट्रीयल इस्टेट अॅन्ड इंटीग्रेटेड टेक्स्टाईल पार्क (केएटीपी) या संस्थेची सन 2026-2031 सालची संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली. एकूण 15 जागांसाठी तितकेच अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी जाहीर केले. त्यानंतर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांच्या अध्यक्षतेखाली नुतन संचालक मंडळाची बैठक झाली. त्यामध्ये चेअरमनपदी प्रकाश दत्तवाडे आणि व्हा. चेअरमनपदी बाळासाहेब कलागते यांची सर्वानुमते बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
नुतन संचालक मंडळ पुढीलप्रमाणे :- सर्वसाधारण गट : प्रकाश ज्ञानबा दत्तवाडे, बाळासाहेब गणपती कलागते, सर्जेराव दत्तात्रय पाटील, रमेश तात्यासो कबाडे, सुरेश मारुती बावणे, महावीर बाळू येळरुटे, नरसिंह कुंदनमल पारीक, सुमेरु सुरगोंडा पाटील, शितल अशोक अम्मण्णावर, अहमद बाबालाल मुजावर, आनंदा मनोहर कोरे, महिला गट : शकुंतला सदाशिव जाधव, सुवर्णा जयप्रकाश पाटील, एससी/एसटी गट : महादेव कृष्णाजी कांबळे, संस्था गट : चंद्रकांत दत्तात्रय इंगवले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.