इचलकरंजीत कर्नाटकी बेंदूर उत्साहात धाकल्या पाटलांच्या बैलाने ताेडला कर
दि.३० जून२०२६ : वस्त्रनगरी इचलकरंजीत पारंपारिक कर्नाटकी बेंदूर सण माेठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. तर सायंकाळी गावभागातील जुनी गावचावडी येथे 121 वर्षाची परंपरा असलेला मानाचा पारंपारिक कर ताेडण्याचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये धाकल्या पाटलांच्या बैलाने कर ताेडला. धाकल्या पाटलांच्या बैलाने कर ताेडला तर पाऊसमान चांगले हाेते अशी आख्यायिका आहे.शहर व परिसरात कर्नाटकी बेंदूर उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासून गाय-बैलांना न्हाऊ माखू घातले जात हाेते. त्यानंतर शिंगांना रंगरंगाेटी, अंगावर झूल घालून पुरणपाेळीचा नैवेद्य खायला दिला गेला. त्याचबराेबर घराेघरी मातीचे बैल आणून त्यांची हरभयाची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबाेळे शिंगांवर ठेवून मनाेभावे पुजा करुन पुरणपाेळीचा नैवेद्य दाखविला. बैलांना सजविण्यासाठी लागणारे साहित्य विक्रीसाठी बाजारपेठेत मांडण्यात आलेल्या स्टाॅलवर बळीराजाने गर्दी केली हाेती. सकाळपासून बैलांना आंघाेळ घालून त्यांना विविध आकर्षक रंगांनी व फुलांनी सजवून त्यांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येत हाेती. शहरात अनेक ठिकाणी कर ताेडण्याचा कार्यक्रमही पार पडला. तत्पूर्वी बैल पळविणे शर्यतीत विजयी झालेल्या बैल मालकांनी आपल्या बैलाची वाजत गाजत जल्लाेषात मिरवणूक काढली. मिरवणूक पाहण्यासाठी व कर ताेडण्याचा आनंद लुटण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली हाेती.


बैल पळविणे शर्यतीत माेठ्या गटात पंकज गजानन घाेडके (प्रथम), निलेश प्रकाश बुगड (द्वितीय), तुषार संजय आरबाेळे (तृतीय) तर लहान गटात राकेश कलगाेंडा पाटील (प्रथम), विनायक अनिल म्हेत्रे (द्वितीय) व दस्तगीर शाैकत मुजावर (तृतीय) यांच्या बैलांनी बक्षिस मिळविले. तर जनावरांच्या प्रदर्शनात शहर व परिसरातील अनेक जातीवंत जनावरांचा सहभाग हाेता. प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी माेठी गर्दी केली हाेती.
याप्रसंगी उत्तम आवाडे, सतीश पंडित, प्रकाश दत्तवाडे, किशाेर पाटील, शेखर शहा, शिवाजी काळे, बाबू रुग्गे, सुशांत कलागते, अनिकेत पाटील, आशिष पाटील, शैलेश गोरे, अविनाश कांबळे अजिंक्य रेडेकर आदिसह मान्यवर उपस्थित हाेते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बेंदूर कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते, उपाध्यक्ष नंदु पाटील, खजिनदार अहमद मुजावर, पापालाल मुजावर, शांताप्पा मगदूम, राहुल घाट, सागर मगदूम, शिवाजी काळे, राजेंद्र दरीबे, बजरंग कुंभार, डाॅ. विजय माळी, सागर गळदगे, इरफान आत्तार, सागर कम्मे, अरिफ अत्तार आदींसह गावकामगार पाटील, पाेलिस पाटील यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन राजेंद्र बचाटे यांनी केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.