कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचा मिल राेलर पूजन
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.९: हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन 2026-27 या 34 व्या गाळप हंगामासाठी मिल राेलर पूजनाचा धार्मिक विधी कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते विधिवत संपन्न झाला.
यावेळी ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे यांनी, चालू गळीत हंगामात 20 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. हे उद्दिष्ट यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सभासद तसेच बिगर सभासद ऊस उत्पादक शेतकèयांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवून कारखान्याच्या प्रगतीत माेलाचे याेगदान द्यावे, असे आवाहन केले. कारखाना शेतकèयांच्या हिताला सर्वाेच्च प्राधान्य देत असून, ऊस ताेड, वाहतूक, गाळपासाठी शिस्तबद्ध कार्यपद्धती राबवित असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकरी, सभासद, संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या एकत्रित सहकार्यामुळे यंदाच्या हंगामात ऊस गाळपाचे उद्दिष्ट साध्य करील असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाे चाैगुले, माजी चेअरमन उत्तम आवाडे, केन कमिटीचे चेअरमन दादासाे सांगावे, कारखान्याचे संचालक सर्वश्री संजयकुमार काेथळी, अभयकुमार काश्मिरे, सूरज बेडगे, गाैतम इंगळे, प्रकाश पाटील, शितल आमण्णावर, महेश पाटील, पार्श्वनाथ उफर् सुनिल नारे, प्रशांत कांबळे, सुभाष जाधव, साै. वंदना कुंभाेजे, साै. कमल पाटील आणि कार्यकारी संचालक श्री. मनाेहर जाेशी तसेच सांगावचे सभासद शेतकरी महावीर मगदूम व निमशिरगांवचे पापा पाटील व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित हाेते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.