निवडणूक निरीक्षक रणजितसिंह देओल यांनी केली पन्हाळा मतदान केंद्राची पाहणी
कोल्हापूर,: सौ रेणुताई पोवार
दि.25 नोव्हेंबर : महाराष्ट्र विधानपरिषद कोल्हापूर स्थानिक प्राधिकारी द्विवार्षिक निवडणूक 2021 साठीचे निवडणूक निरीक्षक वरिष्ठ सनदी अधिकारी रणजितसिंह देओल यांनी पन्हाळा येथील मतदान केंद्राला भेट
देऊन पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी भैरप्पा माळी, संपर्क अधिकारी तथा एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे, तहसीलदार रमेश शेंडगेआदी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.