हद्दपार आरोपीकडून धारदार लोखंडी शस्त्र जप्त; शिवाजी नगर पोलिसांची कारवाई

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी 

दि. १४ : कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या एका सराईत आरोपीला धारदार लोखंडी शस्त्रासह ताब्यात घेण्यात शिवाजी नगर पोलिसांना यश आले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश अशोक जाधव उर्फ जर्मनी (वय ३२, रा. लिंगाडे मळा, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) याला १४ जुलै रोजी दुपारी सुमारे ३.०५ वाजण्याच्या सुमारास इचलकरंजी येथील जवाहरनगर परिसरातील मोमीन चिकन सेंटरच्या पायऱ्याजवळ संशयास्पदरीत्या फिरत असताना पकडण्यात आले.
त्याच्याकडे झडती घेतली असता १०० रु .त्यात  सुमारे ३३ सेंमी लांबीचे, लाकडी मूठ असलेले धारदार लोखंडी शस्त्र मिळून आले. चौकशीत संबंधित आरोपीला उपविभागीय दंडाधिकारी, इचलकरंजी यांनी २४ जून २०२६ रोजी दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केल्याचा आदेश असतानाही त्याने त्या आदेशाचे उल्लंघन करून जिल्ह्यात प्रवेश केल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार विशाल बाबूकृष्ण खराडे यांच्या फिर्यादीवरून शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५६०/२०२६ दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ तसेच आर्म्स अॅक्ट कलम ४ व २५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई सपोनि मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजय मस्कर, सुभाष सरवडेकर, प्रदीप पाटील, सदाम सनदी आणि तुषार सूर्यवंशी यांनी केली. पुढील तपास सपोनि मस्कर करीत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.