ब्राह्मण सभेतर्फे उल्हास लेले यांना यंदाचा ‘लाेकमान्य टिळक पुरस्कार’ जाहीर

इचलकरंजी: विजय मकोटे 
दि.१६ जुलै २०२६: येथील इचलकरंजी ब्राह्मण सभेच्या वतीने दरवर्षी दिला जाणार मानाचा ‘लाेकमान्य टिळक पुरस्कार’ यंदा सामाजिक क्षेत्रात वअखिल भारतीय ग्राहक पंचायतचे ज्येष्ठ संघटक म्हणून भरीव कामगिरी केलेबद्दल गाेपाळ तथा उल्हास चिंतामण लेले यांना जाहीर करण्यात आला आहे. त्याचबराेबर ‘श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घाेरपडे सरकार’ हा पुरस्कार संताेष अविनाश साधले, साै. स्नेहल विनय दंडगे, डाॅ. श्रीकृष्ण श्रीपाद काळे व श्रीकृष्ण नारायण गाेरे यांना उद्याेजक, शैक्षणिक, वैद्यकीय व व्यावसायिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ज्ञाती बांधवांना देण्यात येणार आहे. तर अध्यात्मिक क्षेत्रातील ‘वेदाेनारायण पुरस्कार’ वेदमूर्ती विश्वजित विजय मणेरीकर यांना आणि ‘सेवाभावी संस्था’ पुरस्कार मैत्री फौंडेशन इचलकरंजी यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती ब्राह्मण सभा इचलकरंजी यांचे वतीने देण्यात प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
        शनिवार १  ऑगस्ट २०२६ राेजी लाेकमान्य टिळक पुण्यदिनी या पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे. त्याचबराेबर कार्यक्रमाचे औचित्य साधत विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या ब्राह्मण ज्ञाती बांधवांचा विशेष गाैरव तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थी, विद्यर्थिनींचा गुणगाैरव समारंभाचे आयाेजन करण्यात आले आहे. इयत्ता १० वी मध्ये ८५टक्के व इयत्ता १२ वी ८५ टक्के गुण प्राप्त विद्यार्थी तसेच इयत्ता ५ वी आणि ८ वी मधील एनएमएमएस आणि एनटीएसएमटीएस, नेट-सेट, युपीएससी, स्काॅलरशिप, तसेच कला, क्रीडा, आराेग्य व अध्यात्मिक, याेग क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय पातळीवर विशेष पुरस्कार मिळवलेल्या गुणीजणांचा गाैरव करण्यात येणार आहे.
पात्र विद्यार्थ्यानी गुणपत्रिका व याेग्य सर्टििफकेटच्या झेराॅक्स प्रतिसह २० जुलै २०२६ पर्यंत ब्राह्मण सभा कार्यालय झेंडा चाैक इचलकरंजी येथे नांवे नाेंदवावीत, असे आवाहन ब्राह्मण सभेतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ८३०८४०९०४० अथवा ९२२५८३१०३१ या क्रमांकावर संपर्क साधावा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.