रत्नागिरी,: सचिन पाटोळे
दि.२६ जुलै २०२६ : महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते तसेच कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या नेतृत्वाखाली कोकण परिक्षेत्रातील रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले दोन दिवसीय “Capacity Building and Behavioural Leadership Initiative Training” यशस्वीरित्या पार पडले.

रत्नागिरी येथील विश्वेश्वरय्या हॉलमध्ये २१ व २२ जुलै २०२६ रोजी झालेल्या या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांच्या नेतृत्व क्षमतेचा विकास, प्रशासकीय कौशल्य अधिक प्रभावी करणे, नागरिकाभिमुख पोलीसिंगला चालना देणे तसेच आधुनिक पोलीस व्यवस्थापनाच्या संकल्पनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्य विकसित करणे हा होता.
दोन दिवस चाललेल्या प्रशिक्षणात नेतृत्व कौशल्य (Leadership Skills), प्रशासकीय क्षमता (Administrative Competence), प्रभावी संवादकौशल्य (Effective Communication), वर्तन कौशल्य (Behavioural Skills) तसेच नागरिकांशी संवेदनशील, सकारात्मक आणि विश्वासार्ह संवाद प्रस्थापित करण्याच्या विविध पैलूंवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रशिक्षणात पोलीस उपअधीक्षक भानुदास खटावकर, मौसमी निलाखे आणि ईशानी काचन यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. त्यांनी निर्णयक्षमता, प्रभावी नेतृत्व, बदलत्या काळातील पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका, संघभावना वृद्धिंगत करण्याच्या पद्धती, जबाबदारीची जाणीव, निर्णय प्रक्रियेतील परिणामकारकता तसेच नागरिकांशी संवेदनशील व विश्वासपूर्ण संवादाचे महत्त्व यावर उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
प्रशिक्षणादरम्यान आयोजित संवादात्मक सत्रांमुळे सहभागी अधिकाऱ्यांना दैनंदिन पोलीस कामकाजात उपयुक्त ठरणारी व्यावहारिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली. सहभागी अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचे नेतृत्व विकास प्रशिक्षण पोलीस दलाच्या कार्यक्षमतेसाठी आणि नागरिकाभिमुख पोलीसिंग अधिक बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.