आषाढी एकादशीनिमित्त कोरोचीत राष्ट्रीय बजरंग दलातर्फे विद्यार्थ्यांना फराळ व पिण्याच्या पाण्याचे वाटप

कोरोची सलीम माणगावे 
दि.२६ जुलै २०२६ : आषाढी एकादशीनिमित्त कोरोची येथे आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दल, कोरोची प्रखंड यांच्या वतीने लोकमान्य नगर विद्यामंदिर आयोजित दिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना फराळ व पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

            यावेळी राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हा मंत्री पंढरीनाथ ठाणेकर यांनी सांगितले की, राष्ट्रीय बजरंग दल हे देव, देश आणि धर्माच्या कार्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असते. आषाढी वारीच्या पावन निमित्ताने विद्यार्थ्यांचे तोंड गोड करण्याचा उपक्रम राबविण्यात आल्याचा आनंद असून, अशा सामाजिक उपक्रमांमधून समाजात सेवाभाव आणि संस्कार रुजविण्याचे कार्य केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

             या उपक्रमास संघटनेचे संपर्कप्रमुख संतोष हात्तीकर, पोलीस पाटील सावकर हेगडे, नितीन चौगुले, जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता पाटील, नियोजक मारुती शिंगारे (मामा), राजू शिंदे, अंकुश दुर्गाडे, ओंकार साळी, अतुल सातपुते, स्वप्निल शिंगारे, अमोल सुतार, नितीन झणझणे, महेश साळी, भरत सोनार, बाळासाहेब किल्लेदार, सागर पाटील, संदीप पाटील यांच्यासह राष्ट्रीय बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे दिंडीत सहभागी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, उपस्थितांनी राष्ट्रीय बजरंग दलाच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.