मणेरे विद्यालयात 9 ऑगस्ट क्रांती दिन उत्साहात साजरा.
कबनूर : हबीब शेखदर्जी
दि.९ : श्री.डी.ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, सौ. कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विद्या मंदिर, मणेरे हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यालयातक्रांती दिन उत्साहात साजरा झाला.या कार्यक्रमास सर्व मान्यवर उपस्थितीत होते. संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री. सुभाष केटकाळे उपस्थितीत होते. संस्थेचे समन्वयक मा. श्री. अशोक वसगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रांतीदिना निमित्त भाषणे केली. क्रांतीदिना निमित्ताने विद्यार्थ्यांची उद्बोधनपर रॅली काढली. या कार्यक्रमास हायस्कूल व कॉलेजच्या प्राचार्या सौ. वैशाली मंगसुळे, प्राथमिक मुख्याध्यापिका सौ. पुष्पा ऐनापुरे, हायस्कूल उपमुख्याध्यापिका सौ. संगिता व्हनबट्टे, सर्व विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.