गोकुळ’ परिवारातर्फे संचालक चेतन नरके यांचा सत्कार
कोल्हापूरःप्रतिनिधी
दि.२९. गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये संघाचे संचालक चेतन नरके यांना सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अर्थ, कृषी,बँकिंग, सहकार आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उडान – डेअर टू ड्रीम या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले याबद्दल त्यांचा सत्कार संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांचे हस्ते व सर्व संचालक मंडळाच्या उपस्थित सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन विश्वास पाटील म्हणाले कि संचालक चेतन नरके हे विविध संस्थेशी निगडीत आहेत. त्यांनी अल्पावधीतच सहकार, दुग्धव्यवसाय, कृषी, समाजकारण आणि राजकारणात उल्लेखनीय काम केले आहे. त्यांनी या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली. भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
यावेळी बोलताना संचालक चेतन नरके म्हणाले कि हा पुरस्कार म्हणजेच माझी सहकार क्षेत्रात केलेल्या कामाची पोच पावती आहे व बाहेरील देशात केलेल्या कामा पेक्षा सध्या करत असलेल्या सहकार क्षेत्रातील कामामध्ये समाधानी आहे असे मनोगत व्यक्त केले व सत्कार केल्या बद्दल संचालक मंडळाचे आभार मानले.
याप्रसंगी संघाचे चेअरमन मा.श्री.विश्वास पाटील, माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अभिजित तायशेटे, शशिकांत पाटील –चुयेकर, किसन चौगले, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे,अंबरिषसिंह घाटगे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रटरी एस.एम.पाटील व संघाचे अधिकारी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.