डीकेटीईच्या अभिनंदन माने याची इटली येथील विद्यापीठात पूर्ण स्कॉलरशिपवर उच्च शिक्षणासाठी निवड
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१८ः डीकेटीईच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थी अभिनंदन माने याची उच्च शिक्षणासाठी इटलीतील प्रतिष्ठीत युनिर्व्हर्सिटी ऑफ नॅपल्स फेड्रिको-२ येथे संपूर्ण स्कॉलरशिपवर निवड झाली आहे. या विद्यापीठाचे क्युएस जागतिक क्रमवारीत ३७९ वे स्थान असून, अभिनंदनला विद्यापीठाकडून ७ लाख रुपयांची शैक्षणिक शिष्यवृत्ती तसेच राहण्याची सुविधा व विद्यावेतन मिळणार आहे. या निवडीमुळे डीकेटीईच्या विद्यार्थ्यांची परदेशात उच्च शिक्षण घेण्याची परंपरा कायम राहीली आहे.
अभिनंदनने परदेशातील उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या जीआरई व आयईएलटीएस परिक्षांमध्ये यश संपादन केले. विशेष म्हणजे, परेदशी विद्यापीठातील प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया त्याने स्वतःच्या प्रयत्नांतून पूर्ण केल्याने या प्रक्रियेसाठी होणारा अतिरिक्त खर्चही त्याने वाचविला.
डीकेटीईमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरींग अभ्यासक्रमातील मेटॅलर्जी, मशिन टुल्स अॅड प्रोसेसिंग, वर्कशॉप प्रॅक्टीस, टूल इंजिनिअरींग मेकॅट्रॉनिक्स इंडस्ट्रीयल अॅटोमेशन, हायड्रॉलिक्स व न्युमॅटिक्स या विषयांचा त्याच्या शैक्षणिक प्रगतीला मोठा फायदा झाला. तसेच विभागातील स्मार्ट फौन्ड्री, बॉश लॅब, मॅन्युफॅक्चरींग प्रोसेस या लॅब येथे मिळालेले प्रात्यक्षिक प्रशिक्षण आणि प्रकल्पाधारित शिक्षण यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षणासाठी आवश्यक कौशल्ये विकसीत करता आली.
डीकेटीईचे जगभरातील ३२ हून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यापीठाशी सामंजस्य करार असून, त्यातून विद्यार्थ्यांसाठी जागतिक उच्च शिक्षणाच्या संधीची दारे खुली झाली आहेत. डीकेटीईच्या विद्यार्थ्यांना केवळ पदवीपुरते मर्यादीत न ठेवता त्यांना जागतिक व्यासपीठावर झेप घेण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व कौशल्याधारित संधी उपलब्ध करुन देण्याचा संस्थेचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. परदेशात उच्च शिक्षणासाठी डीकेटीईने निर्माण केलेल्या संधीमुळे टेक्स्टाईल व इंजिनिअरींग क्षेत्रात एक वेगळाच ठसा उमटला आहे डॉ सपना आवाडे यांनी यावेळी गौरवाउदगार काढले.
विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सचिव डॉ.सौ.सपना आवाडे,कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्वस्त यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना संचालिका प्रा.डॉ.एल.एस.आडमुठे, प्रा.डॉ.व्ही.आर.नाईक,विभागप्
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.