इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण उत्साहात संपन्न
इचलकरंजी : विजय मकोटे
दि.१६: भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर काँग्रेसचे अध्यक्ष मा. प्रकाश मोरबाळे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी श्री प्रकाश मोरबाळे यांनी स्वातंत्र्य लढ्याचा आढावा घेऊन काँग्रेस हीच या देशाची प्रमुख संघटना असून सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचा झाल्यास काँग्रेसनेच ही जबाबदारी घ्यावी लागेल अशा आशयाचे विधान करून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मा. शशांक बावचक्कर यांनी देशापुढील सध्याची आव्हाने व तरुणांची मानसिकता याचे विवेचन करून तरुणांना या देशातील शिक्षण पद्धती व एकूणच व्यवस्था ही बदलायची असून हा बदल केवळ काँग्रेस पक्ष भारतीय राज्यघटनेला प्रमाण मानून करू शकतो असे सांगून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी उद्योगपती विठ्ठलरावजी डाके, रहमान चाचा खलिफा, महादेव आण्णा कांबळे, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय कांबळे, इंडस्ट्रियल इस्टेटचे चेअरमन राहुल खंजिरे, शहर काँग्रेस अध्यक्ष अजित मिणेकर यांचे सह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते बंधू-भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपाध्यक्ष बाबासाहेब कोतवाल यांनी केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.