इचलकरंजी व्यापारी सहकारी पतसंस्थेच्या दुसऱ्या शाखेचा दिमाखात शुभारंभ
जवाहरनगर-कबनूर शाखेचे उद्घाटन; सहकार क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
इचलकरंजी :हबीब शेखदर्जी
दि.१६ : येथील इचलकरंजी व्यापारी सहकारी पतसंस्थेच्या जवाहरनगर-कबनूर येथील दुसऱ्या शाखेचा शुभारंभ महाराष्ट्र नागरी सहकारी बँक्स फेडरेशनच्या उपाध्यक्ष सौ. वैशालीताई आवाडे यांच्या शुभहस्ते आणि महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक अॅड. जवाहर छाबडा यांच्या अध्यक्षतेखाली दिमाखात पार पडला.यावेळी इचलकरंजी महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, नगरसेवक मनोज हिंगमिरे, शिवाजी पाटील, सयाजी चव्हाण, प्रदीप धोत्रे, राजू बोंद्रे तसेच सामाजिक कार्यकर्ते जहांगीर पट्टेकरी, सुनील पवार, संतोष कुपटे, सुनील निवळे, दत्तात्रय मांजरे, सुकुमार पाटील, शशिकांत मोहिते, बंडोपंत लाड, डॉ. अरुण पाटील, डॉ. संजय पाटील, रवींद्र झोले, राजेंद्र बचाटे, मनोहर भंडारे, बाबुराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच मणेरे हायस्कूलचे शितल मणेरे, अनिल मणेरे, दि. इचलकरंजी मर्चंट बँकेचे चेअरमन राजगोंडा पाटील, व्हाईस चेअरमन गजानन लोंढे, संचालक ईरगोंडा पाटील, विजय कामत, चंद्रकांत बिंदगे, दत्तात्रय मोहिते, व्यंकटेश शहापूरकर, राजेंद्र शिरगुप्पे तसेच संस्थेचे माजी संचालक विलास कोरवी, दत्तात्रय कुंभोजे, शंकरराव घेवडे यांची उपस्थिती होती.
या नव्या शाखेच्या माध्यमातून जवाहरनगर-कबनूर परिसरातील व्यापारी, उद्योजक, सभासद आणि नागरिकांना संस्थेच्या विविध आर्थिक व बँकिंग स्वरूपाच्या सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध होणार आहेत. संस्थेच्या विस्ताराच्या दृष्टीने या शाखेचा शुभारंभ महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे चेअरमन सूर्यकांत साखरे, व्हाईस चेअरमन संजय वठारे, ज्येष्ठ संचालक विलासराव गाताडे, संचालक दिलीप वणकुद्रे, बाळासो बरगाले, शशिकांत शेटके, सुभाष तोडकर, सुभाष पाटील, नकुल झेले, आशिष पाटील, विलास चव्हाण, तसेच सौ. सुवर्णा म्हेतर, भारती शिंदे, तज्ञ संचालक धनंजय पाटील, अमर सडगर, सागर मुसळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
कार्यक्रमास सभासद, व्यापारी, नागरिक आणि संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे व्यवस्थापक विश्वनाथ रोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.