परिवहन विभागाच्या फेसलेस सेवांचा वीस हजारहून अधिक नागरिकांना लाभ

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे

सांगली, मयुरी देशपांडे 

दि.१३ : महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागामार्फत नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाईन व फेसलेस सेवांना सांगली जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वाहन प्रणालीवरील फेसलेस सेवांचा १६ हजार ४१४  नागरिकांनी तर सारथी प्रणालीवरील फेसलेस सेवांचा ५  हजार५५०  नागरिकांनी लाभ घेतला आहे. ही माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

            प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, चालू वर्षात सांगली उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत https://vahan.parivahan.gov.in/ या संकेतस्थळ (वेबसाईट) वर वाहन प्रणालीवरील विविध फेसलेस सेवांचा एकूण १६ हजार ४१४ नागरिकांनी लाभ घेतला आहे. यामध्ये विशेष परवान्याचे १२  हजार १९४ , परवाना नूतनीकरणाचे १ हजार ७६७ , वाहन तपशील माहितीचे १  हजार ५७८  वाहन हस्तांतरणाचे ८७१  नोंदणी रद्द करण्याचे १९५ , तर ना-हरकत प्रमाणपत्राचे ०९  लाभार्थी आहेत.

            तसेच सारथी प्रणालीच्या https://sarathi.parivahan.gov.in/ या संकेतस्थळावर फेसलेस सेवांचाही नागरिकांकडून लाभ घेतला जात आहे. या प्रणालीद्वारे एकूण ५  हजार ५५०  नागरिकांनी सेवांचा लाभ घेतला असून, यामध्ये शिकाऊ अनुज्ञप्तीचे ५  हजार ९३  दुय्यम अनुज्ञप्ती प्रतीचे १५७ , अनुज्ञप्ती नावात बदलाचे १३१ , अनुज्ञप्ती नूतनीकरणाचे ९५ , अनुज्ञप्तीवरील पत्ता बदलाचे ४४ , अनुज्ञप्ती वरील फोटो व सही बदलाच्या १५ , अनुज्ञप्ती तपशीलाची माहिती १३  तर अनुज्ञप्तीचे पुननिर्गमनाच्या 02  लाभार्थ्यांचा समावेश आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.