धन्वंतरी जयंती निमित्त मोफत रक्तदाब व मधुमेह तपासणी शिबीर
इचलकरंजी: विजय मकोटे
दि 4 रोटरी सेंट्रल एक्झिक्युटीव्ह क्लबतर्फे धन्वंतरी जयंती व डायबेटीस निर्मुलन दिनाचे औचित्य साधत ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. त्यामध्ये 50 सदस्यांनी भाग घेतला. या प्रोजेक्ट कमिटीचे प्रमुख डॉ. कुबेर मगदूम, डॉ. प्रकाश पाटील, डॉ. सुनिता चौगुले यांनी तपासणी केली. तसेच डॉ. आरती कोळी यांनी ‘मधुमेह व ताण-तणाव‘ या विषयावर व्याख्यानात रक्तदाब, रक्तातील साखर रॅण्डम शुगर नेहमी तपासत रहावे, नियमित व्यायाम, चालणे फिरणे, योगा प्राणायम करत राहणे व खाण्या-पिण्यावर निर्बंध ठेवणे याबाबत उत्तम मार्गदर्शन केले. हे शिबीर संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
प्रारंभी स्वागत सौ. हेमल सुलतानपूर व सौ. सुजाता कोईक यांनी केले. त्यानंतर अंबरिश सारडा यांची रोटरी मानवसेवा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रकाशराव सातपुते व प्रोबस क्लब अध्यक्ष विलास पाडळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आरोग्य तपासणी कमिटी सदस्यांचा सत्कार रोटरी सेंट्रल सेक्रेटरी राजू तारदाळे यांचे हस्ते करण्यात आला. तसेच नवीन सदस्य व वाढदिवस असलेल्या सदस्यांचे सत्कार करण्यात आले.
या उपक्रमास प्रोबसचे उपाध्यक्ष गजानन शिरगुरे, सेक्रेटरी शिवबसू खोत, गजानन सुलतानपूरे, डी. एम. बिरादार, अविनाश खोत, दिलीप भंडारे, प्रकाश आकिवाटे, विजय हावळे, सुर्यकांत बिडकर, हेमंत कवठे, काशिनाथ जगदाळे, अजित कोईक, सौ. सुप्रिया कोष्टी, सौ. प्रमोदिनी देशमाने, सौ. ऋतुजा जोशी, सौ. शैलजा सवदिमठ, सौ. प्राजक्ता होगाडे, सौ. अलका काटकर, सौ. शालिनी जगदाळे, सौ. संजिवनी कोष्टी, जयश्री संकेश्वरी, विजय बनसोडे, प्रदिप लड़गे, सौ. संगिता लडगे, महावीर कुरुंदवाडे, अॅड. विश्वास चुडमुंगे, पद्माकर तेलसिंगे, दिलीप शेट्टी, मनोहर कुराडे, प्रकाश जगताप, शशिकांत बडवे, दिपक दत्तवाडे यांच्यासह सभासद उपस्थित होते. आभार प्रदर्शन सौ. सुजाता कोईक यांनी केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.