देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखान्याकडून ऊस उत्पादकांना आणखी प्रतिटन १०० रुपये प्रमाणे आदा : पी. एम. पाटील
कबनूर :अन्वर मुल्ला
दि .११ : येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार लिज युनिट श्री रेणुका शुगर्स या साखर कारखान्यास सन २०२५-२६ च्या गळीत हंगामात ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना कारखाना व्यवस्थापनाने आणखी दिलासा दिला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रतिटन १०० रुपये याप्रमाणे अतिरिक्त रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन पी. एम. पाटील यांनी दिली.
पी. एम. पाटील म्हणाले, सन २०२५-२६ च्या गळीत हंगामात कारखान्याने एफआरपीप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३५१८ रुपये याप्रमाणे ऊस बिलाची रक्कम अदा केली आहे. त्यानंतर आता प्रतिटन आणखी १०० रुपये याप्रमाणे अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
कारखान्याने या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला चांगला दर मिळावा तसेच त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा व्हावी, यासाठी व्यवस्थापन सातत्याने प्रयत्नशील आहे. परिसरातील इतर कारखान्यांच्या तुलनेत ऊस उत्पादकांना अधिकाधिक दर देण्याचा कारखान्याचा प्रयत्न असल्याचेही पाटील यांनी सांगितले. तरी येत्या सन २०२६-२७ च्या गळीत हंगामात शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस श्री रेणुका शुगर्स कारखान्यास गळितासाठी पाठवून सहकार्य करावे, असे आवाहनही पी. एम. पाटील यांनी केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.