बिल्डर्स असाेशिएशन व क्रेडाई इचलकरंजीर्ते गुणवंत अभियंता पुरस्कार जाहीर
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१२ : सर माेक्षगुंडम विश्वेशरैय्या जयंती आणि जागतिक अभियंता दिनाचे औचित्य साधत बिल्डर्स असाेसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी, क्रेडाई इचलकरंजी आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने बांधकाम क्षेत्रात कार्यरत गुणवंत अभियंता (इंजिनीअर) यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये इंजिनीयर राजेंद्र उपाध्ये, इंजिनीयर सुहास अकिवाटे, इंजिनीयर डाॅ. किरण पवार, इंजिनीयर पिरगाेंडा (राजू) पाटील व इंजिनीयर इब्राहीम काझी यांचा समावेश आहे, अशी माहिती क्रेडाई इचलकरंजी अध्यक्ष रणजीत लायकर, बिल्डर्स असाेसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटर चे अध्यक्ष शितल काजवे व अल्ट्राटेक सिमेंटचे डिलर नितीन धूत यांनी दिली.
बिल्डर्स असाेसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटर, क्रेडाई इचलकरंजी आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या वतीने बांधकाम क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरीबद्दल गुणवंत अभियंत्यांचा दरवर्षी पुरस्कार देऊन गाैरव करण्यात येताे. यंदाही उल्लेखनीय काम केलेल्या अभियंत्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. हा पुरस्कार साेहळा बुधवार १६ सप्टेंबर राेजी सायंकाळी ६.३० वाजता इचलकरंजी येथील लायन्स ब्लड बँक येथे संपन्न हाेत आहे. इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी अल्ट्राटेक सिमेंटचे टेरिटरी सेल्स हेड अविनाश जेऊरकर आणि रिजनल टेक्निकल हेड विजयकुमार चव्हाण हे अल्ट्राटेक पर्यावरणपूरक काँक्रिट व बिल्डींग उत्पादनांची माहिती या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी रमेश मर्दा, फैय्याज गैबान, महांतेश कोकळगी , संजय रुग्गे, मयुर शहा, सय्यद गफारी ,राजेंद्र शिंत्रे, राजेंद्र खंडेराजुरी, जहीर सौदागर, तानाजी हराळे, पुंडलिक जाधव, दिलीप पटेल, अल्ट्राटेक सिमेंटचे डिलर हर्षल धुत व विभागीय तांत्रिक प्रबंधक काेल्हापूर सागर छांगाणी, चॅनेल रिलेशनशीप मॅनेजर कल्पक मेहता आदी उपस्थित हाेते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.