डेक्कन चौक परिसरात ‘इंगवले पेट्रोलियम’ची सुविधा!
आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्या हस्ते एचपी पेट्रोलियम पंपाचे उद्घाटन; नगरसेविका प्रियांका इंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांची उपस्थिती
इचलकरंजी : अन्वर मुल्ला
दि.१३: डेक्कन चौक परिसरातील नागरिकांच्या सुविधेत भर घालणाऱ्या हिन्दुस्तान पेट्रोलियमच्या इंगवले पेट्रोलियमचा शुभारंभ दिमाखदार सोहळ्यात करण्यात आला. आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेशराव हाळवणकर, उपमहापौर अनिल डाळ्या आणि एचपी पेट्रोलियमचे प्रमुख समर रिझवी यांच्या हस्ते पेट्रोल पंपाचे उद्घाटन करण्यात आले.महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३च्या नगरसेविका प्रियांका प्रसाद इंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सोहळ्याला राजकीय, सामाजिक, औद्योगिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह नागरिकांची मोठी उपस्थिती होती. नगरसेविका प्रियांका इंगवले यांचा वाढदिवस आणि नव्या पेट्रोल पंपाचा शुभारंभ असा दुहेरी योग साधत इंगवले परिवाराच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
डेक्कन चौक आणि परिसरातील नागरिकांची वाढती गरज लक्षात घेऊन माजी नगरसेवक चंद्रकांत इंगवले, प्रसाद इंगवले आणि प्रशांत इंगवले यांनी पेट्रोल पंप उभारण्याचा निर्णय घेतला. या माध्यमातून नागरिकांना शुद्ध व दर्जेदार इंधनासोबतच चांगली, तत्पर आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील वाहनधारकांना इंधनासाठी दूरवर जाण्याची गरज कमी होणार असून, या नव्या सुविधेचा नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
उद्घाटन सोहळ्यास कल्लाप्पाण्णा आवाडे बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे, महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, उद्योगपती राजू चव्हाण, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, नगरसेवक योगेश पाटील, गटनेते विठ्ठल चोपडे, मनीषा कुपटे, सरिता आवळे, राजू बोंद्रे, सुशांत कलागते, नितेश पवार, स्मिता चौगुले, विकास चौगुले, अरुणा बचाटे, माजी नगराध्यक्ष ॲड. अलका स्वामी, रवी रजपुते, रूपा बुगड, विनया महाजन, प्रमोद बचाटे, ओंकार सुर्वे, मनीषा नवनाळे, नितीन कोकणे, बाळासाहेब कलागते, विजय पाटील, नरसिंह पारीख, राजू मगदूम, मनोहर मनरे, सचिन राणे, संदीप पाटील, मदन कारंडे, प्रभाग समिती अध्यक्ष नंदकुमार पाटील, स्नेहल रावळ, जहांगीर पटेकरी, मनोज हिंगमिरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून नगरसेविका प्रियांका इंगवले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच नव्याने सुरू झालेल्या इंगवले पेट्रोलियमच्या शुभारंभाबद्दल इंगवले परिवाराचे अभिनंदन केले.कार्यक्रमाचे स्वागत महामहादेवी पतसंस्थेच्या संचालिका सारिका प्रशांत इंगवले यांनी केले. त्यांनी उपस्थित मान्यवर आणि नागरिकांचे स्वागत करून कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आभार मानले.

इंगवले पेट्रोलियमच्या शुभारंभामुळे डेक्कन चौक परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन गरजेत आणखी एका महत्त्वपूर्ण सुविधेची भर पडली असून, दर्जेदार इंधन आणि चांगली सेवा उपलब्ध होणार असल्याने वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.