पाच गावांचा पुरवठा कारभार आता इचलकरंजीतून
आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्याला यश : कायमस्वरुपी पुरवठा निरिक्षण अधिकारी मिळणार
इचलकरंजी : विजय मकोटे
दि.१३: इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील चंदूर, कबनूर, काेराेची, तारदाळ आणि खाेतवाडी ही पाच गावे आता इचलकरंजी पुरवठा कार्यालयाशी जाेडण्यात येणार असून, येथील पुरवठा निरीक्षक हे पद कायमस्वरूपी अस्तित्वात आणण्याचे आदेश राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील पुरवठा व्यवस्थेशी संबंधित विविध मागण्यांबाबत अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या वेळी आमदार राहुल प्रकाश आवाडे यांनी मांडलेल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून, संबंधित मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. बैठकीस संबंधित अधिकारी उपस्थित हाेते.
सदर पाचही गावे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात येत असली तरी रेशनकार्ड व अन्नधान्य पुरवठ्याशी संबंधित कामांसाठी ग्रामस्थांना हातकणंगले तहसील कार्यालयावर अवलंबून राहावे लागत हाेते. वारंवार मारावे लागणारे हेलपाटे आणि त्यामुळे हाेणारा आर्थिक भुर्दंड यामुळे नागरिक त्रस्त हाेते. ही सर्व गावे भाैगाेलिकदृष्ट्या इचलकरंजीजवळ असल्याने हा कारभार इचलकरंजी पुरवठा कार्यालयाकडे साेपवण्याची मागणी आमदार आवाडे यांनी लावून धरली हाेती. त्यानुसार मंत्री भुजबळ यांनी ही पाचही गावे इचलकरंजीतील अपर तहसीलदार कार्यालयार्माफत चालणाèया पुरवठा विभागाशी जाेडण्याचे निर्देश दिले. यामुळे या गावांतील रास्तभाव दुकानांचे कामकाज आता इचलकरंजीतूनच सुरळीत चालेल.
तालुकानिहाय आकृतीबंधामुळे २०२२ मध्ये इचलकरंजी कार्यालयातील पुरवठा निरीक्षक हे पद रद्द हाेऊन ते तात्पुरत्या स्वरूपात ठेवण्यात आले हाेते. पूर्णवेळ अधिकारी नसल्याने नागरिकांची कामे रखडत हाेती. या पार्श्वभूमीवर दाेन पुरवठा निरीक्षक अधिकारी आणि लिपिकाची पदे कायमस्वरूपी मंजूर करण्याची मागणी मान्य करत मंत्र्यांनी लॅप्स झालेली पदे पुनर्स्थापित करून त्वरित कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत.सार्वजनिक वितरण व्यवस्थेर्माफत वितरित हाेणाèया जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणावर पारदर्शकता व देखरेख ठेवण्यासाठी 2021 च्या शासन निर्णयानुसार विविध स्तरांवर समित्यांची आवश्यकता हाेती. त्यानुसार इचलकरंजी महानगरपालिका स्तरावर पुरवठा दक्षता समिती गठीत करण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली.यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच महेश पाटील, काेंडीबा दवडते, सुखदेव माळकरी व संबंधित अधिकार उपस्थित हाेते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.