कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्याच्या 34 व्या हंगामाकरीता बाॅयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न

हुपरी : सलीम मुल्ला 
दि.४: हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६ -२७  या ३४ व्या ऊस गाळप हंगामासाठी संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे व साै. किशाेरी आवाडे आणि संचालक आमदार राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बाॅयलर अग्निप्रदीपन संपन्न झाला.


शेतकèयांसाठी कारखान्याच्या विविध याेजनांमुळे सन २०२६-२७  या ३४ व्या गाळप हंगामाकरीता सुमारे २० हजार हेक्टर ऊस क्षेत्राची नाेंद झालेली आहे. या हंगामातील ऊस गाळपासाठी कारखान्याची मशिनरी व सर्व यंत्रणा सज्ज हाेत आहे. या हंगामातील ऊस ताेडणी वाहतूकीसाठी ३५२  ट्रक-ट्रॅक्टर, ७१४  अंगद व डंपींग, २९३  बैलगाड्या आणि ऊस ताेडणी ७५  मशिन इतक्या ताेडणी वाहतूक यंत्रणेचे करार झालेले आहेत. या हंगामासाठी व्यवस्थापनाने १८  लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. तेंव्हा सर्व सभासद व ऊस पुरवठादार शेतकèयांनी येणा-या हंगामाकरीता पिकविलेला संपूर्ण ऊस गाळपास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे यांनी केले.


समारंभास व्हा. चेअरमन बाबासाे चाैगुले, माजी चेअरमन उत्तम आवाडे, साै. माैश्मी आवाडे, केन कमिटी चेअरमन दादासाे सांगावे, कारखान्याचे संचालक सर्वश्री अभयकुमार काश्मिरे, सुरज बेडगे, आदगाेंडा पाटील, शितल आम्मण्णावर, संजयकुमार काेथळी, गाैतम इंगळे, सुनिल पाटील, प्रकाश पाटील, दरगाेंडा पाटील, पार्श्वनाथ नारे, प्रशांत कांबळे, सुभाष जाधव, कार्यकारी संचालक मनाेहर जाेशी, माजी संचालक सुकुमार किणींगे, हुपरीचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब रणदिवे, अमेय जाधव, गणेश वाईंगडे, डाॅ. स्वप्निल हुपरीकर, प्रकाश जाधव, साै. अलका वाईगडे, साै. त्रतुजा गाेंधळी, साै. भारती नायकवडे, साै. नम्रता कांबळे, उदय पाटील, हुपरीचे माजी उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे, आराेग्य सभापती संताेष वाळवेकर, जि.प.सदस्य कुमार कांबळे, रायगाेंडा डावरे, धनंजय मगदूम, साै. रेवती पाटील, हातकणंगले पं.स. सभापती साै. अश्विनी बिरांजे, आण्णासाहेब इसराण्णा, शरद आलासे, इचलकरंजी नगरसेवक सुशांत कलागते, सतीश मुळीक, नागेश पाटील, प्रमाेद बचाटे आणि कारखान्याचे सर्व अधिकारी उपस्थित हाेते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.