सांगली फोटो व्हिडिओ प्रदर्शनाचे दिमाखदार उद्घाटन
सांगली,
दि. २ : पश्चिम महाराष्ट्रातील छायाचित्रण व चलचित्रण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण ‘सांगली फोटो व्हिडिओ प्रदर्शन २०२६’चे दिमाखदार उद्घाटन २ ऑक्टोबर रोजी धामणी रस्त्यावरील गणलक्ष्मी सभागृहात उत्साहात झाले. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी संजय बजाज, श्रीगोपाल सारडा, गिरीश चितळे, शामसुंदर तोष्णीवाल, सरोज तोष्णीवाल, मनोहर सारडा, नितीन धूत, श्रीकांत मर्दा, सुनीता जाखोटिया, पापालाल सारडा, रंगनाथ सारडा, शैलेंद्र बजाज व नंदकिशोर मंत्री यांची प्रमुख उपस्थिती होती.
छायाचित्रण क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांचे प्रतिनिधी अभिजीत सर (सोनी इंडिया), राजकुमार पिल्ले (कॅनन इंडिया), अमित झा (निकॉन इंडिया) यांच्यासह सुनील जाधव व राजेंद्र शाह यांचीही विशेष उपस्थिती होती. उद्घाटनप्रसंगी श्रीराम जाधव यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांना प्रदर्शनातील विविध दालनांची माहिती देत आधुनिक छायाचित्रण तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती दिली.प्रदर्शनात सोनी, कॅनन, निकॉन यांसह छायाचित्रण, चलचित्रण, चित्रनिर्मिती, प्रकाशयोजना, प्रिंटिंग आणि डिजिटल तंत्रज्ञानाशी संबंधित विविध नामांकित कंपन्यांची दालने उभारण्यात आली आहेत. अत्याधुनिक उपकरणांची पाहणी करताना मान्यवरांनी छायाचित्रण व चलचित्रण क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली.
या प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी संजय सारडा, श्रीराम जाधव, सुधीर कुदळे, शरद सारडा, श्रीकांत बाहेती व अमित शाह यांनी विशेष परिश्रम घेतले. १ ते ३ ऑक्टोबरदरम्यान आयोजित या प्रदर्शनाला महाराष्ट्रातील विविध भागांतील छायाचित्रकार, चलचित्रकार तसेच छायाचित्रण व्यवसायाशी संबंधित व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सन आर्ट स्टुडिओ, सांगली, बालाजी मीडिया, ईश्वरपूर व शिल्पा व्हिजन, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हे प्रदर्शन आधुनिक तंत्रज्ञान, नवीन उपकरणे आणि छायाचित्रण व्यवसायातील विविध संधींची माहिती देणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरत आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.