कार्तिकी एकादशीच्या भक्तिरंगात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् सांगली जिल्हाप्रमुख मोहन वनखंडे यांची फुगडी!
‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ कार्यक्रमात कीर्तनाचा आनंद घेत दोघांनी धरला फुगडीचा ठेका; वारकरी परंपरेचा उत्साह अनुभवायला मिळाला
सांगली :मयुरी देशपांडे
दि.२०: कार्तिकी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या भक्तिमय कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. यावेळी कीर्तनाचा आनंद घेत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे सांगली जिल्हाप्रमुख प्रा. मोहन वनखंडे यांनी एकत्र फुगडीचा ठेका धरला. त्यांच्या या अनोख्या भक्तिमय क्षणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलभक्ती, हरिनामाचा गजर आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरेने कार्यक्रमस्थळी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. कीर्तन सुरू असताना एकनाथ शिंदे आणि प्रा. मोहन वनखंडे यांनी फुगडी खेळत वारकरी परंपरेतील आनंद आणि उत्साहात सहभाग नोंदविला.

राज्याच्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळतानाही संतपरंपरा, वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाशी जोडलेली नाळ या प्रसंगातून अधोरेखित झाली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश, विठ्ठलभक्तीचा गजर आणि वारकरी संस्कृतीचा उत्साह अशा त्रिवेणी संगमात रंगलेला हा फुगडीचा क्षण उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरला.‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या उपक्रमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देतानाच भक्ती आणि परंपरेचा संगम अनुभवायला मिळाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाप्रमुख प्रा. मोहन वनखंडे यांच्या फुगडीने कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यात आणखी रंगत आणली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.