इचलकरंजीचे जहागीरदार श्रीमंत नारायणराव घोरपडे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण; महापालिकेचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित

इचलकरंजी :अन्वर मुल्ला 

दि.25: इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने इचलकरंजीचे जहागीरदार श्रीमंत नारायणराव घोरपडे यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर) विनम्र अभिवादन करण्यात आले. नाट्यगृहानजीक असलेल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी परिवहन समिती सभापती अरुणा बचाटे, प्रभाग समिती सभापती सुशांत कलागते, नगरसेवक अमरजित जाधव, उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखापरीक्षक आरती खोत, सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे, शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर, प्रमोद बचाटे, सचिन माळी, सहाय्यक आयुक्त सुनील शिंदे, रामचंद्र कांबळे, नितीन बनगे, सहाय्यक कर संकलन अधिकारी दीपक खोत, भांडार अधीक्षक गणेश शिंदे, अधीक्षक शितल पाटील, संदीप जोशी, उद्यान व वनसंवर्धन विभागप्रमुख प्रशांत आरगे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संजय कांबळे, महेश बुचडे, सचिन शेडबाळे, दिलीप मगदूम आदी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.