संविधान दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागाच्यावतीने बिंदू चौक येथे संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन व समता रॅली संपन्न
कोल्हापूर: प्रवीण भोसले
दि : २६ भारतीय संविधान दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा प्रशासन व समाज कल्याण विभागाच्या वतीने संविधान दिनानिमित्त ऐतिहासिक बिंदू चौक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक,जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन,अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव,मनपाच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, सहायक आयुक्त सचिन साळे (समाज कल्याण) प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळेस मार्गदर्शन करताना खा.महाडिक म्हणाले,भारतीय संविधानाची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे ते जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.जे भारताला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक म्हणून घोषित करते.या संविधानामध्ये संघराज्य शासन व्यवस्था,मूलभूत अधिकार कायद्यासमोर समानता, धर्मनिरपेक्षता आणि स्वातंत्र्याचे संरक्षण यासारख्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. याची सर्वानी माहिती करून घेवून त्याचा अंगीकार केला पाहिजे. असे सांगून यावेळी त्यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी / विद्यार्थीनी यांनी सहभाग घेतलेल्या संविधान रॅलीस हिरवा झेंडा दाखविण्यात आला. ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा,गंगाराम कांबळे स्मारक,सी.पी.आर मार्गे दसरा चौक येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळयास अभिवादन करून या ठिकाणी त्याची सांगता करण्यात आली.तत्पूर्वी एस. के डिगे फाऊंडेशन मार्फत उपस्थित शालेय- महाविद्यालयीन विद्यार्थ्याना संविधांनाची पुस्तिकेचे वाटप करण्यात आले .
यावेळी अक्षय कुरणे , समाजकल्याण अधिकारी,श्रीमती कविता गायकवाड(लेखाधिकारी),यांच्यासह जिल्ह्यातील संविधान प्रेमी नागरिक,महाविद्यालय विद्यार्थी-विद्यार्थीनी,इतर शासकीय कार्यालयातील अधिकारी – कर्मचारी तसेच तालुका समन्वयक, समतादूत मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सचिन परब तर आभार सचिन पाटील यांनी मानले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.