सहकार भारतीची सांगली आजपासून महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी बैठक

सहकार क्षेत्रातील विविध विषयांवर हाेणार मंथन

सांगली –मयुरी देशपांडे 
दि.२७ : सहकार भारतीची महाराष्ट्र प्रदेशाची कार्यकारिणी बैठक सांगली येथे २८ व २९  नाेव्हेंबर राेजी आयाेजित करण्यात आली आहे. या बैठकीला महाराष्ट्रातून ३०० हून अधिक पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी दिली.      प्रदेश कार्यकारिणी बैठकीचे उद्घाटन २८ राेजी सकाळी ११  वाजता खरे क्लब हाऊस येथे हाेणार असून याप्रसंगी सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ. उदय जाेशी, आमदार सुधीर गाडगीळ, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दत्ताराम चाळके यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. २९ नाेव्हेंबर राेजी सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री संजय पाचपाेर यांच्या मार्गदर्शनात प्रदेश कार्यकारिणी बैठकीचा समाराेप हाेणार आहे,

बैठकीमध्ये महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा तसेच संघटनेच्या संघटनात्मक वाढीसंदर्भात विचार विमर्श हाेणार आहे. सहकार भारती लवकरच सुवर्ण महाेत्सवी वर्षांमध्ये पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण देशभर व महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांचे व परिसंवादाचे आयाेजन केले जाणार आहे. त्या दृष्टीने सुद्धा या प्रदेश कार्यकारिणी बैठकीमध्ये विविध कार्यक्रमांवर शिक्कामाेर्तब केले जाईल,
यासंदर्भात अधिक माहिती देताना विवेक जुगादे यांनी सांगितले की, सहकार भारती ही सहकार क्षेत्राचे माेर्गदर्शन व नेतृत्व करणारी राष्ट्रीय स्तरावरची एकमेव संघटना आहे.

सध्या सहकार क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल घडत असून त्याचे श्रेय हे सहकार भारतीलाच दिले जाते. देशाच्या सहकार धाेरणाप्रमाणेच आता राज्याचेसुद्धा सहकार धाेरण लवकरच येणार आहे. त्यामध्ये सुद्धा सहकार भारतीचा सिंहाचा वाटा आहे. सहकारातील विविध प्रश्न त्यावरील उपाय याेजना व सहकाराच्या वाढीसाठी सांघिकरित्या काय ठाेस उपाययाेजना कराव्यात याची सुद्धा चर्चा या प्रदेश कार्यकारणी बैठकीमध्ये हाेणार आहे. येणा-या काळातील दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून काय उपाययाेजना राबविल्या जाऊ शकतात याचे चिंतन मनन देखील या बैठकीत हाेणार असल्याचे विवेक जुगादे यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला सहकार भारतीचे प्रदेश काेषाध्यक्ष गणेश गाडगीळ, प्रदेश महिला प्रमुख साै, वैशाली आवाडे, सांगली महानगर अध्यक्ष शशिकांत राजाेबा, जिल्हाध्यक्ष सुमंत महाजन, महानगर महामंत्री शैलेश पवार, संघटन प्रमुख संदीप कुलकर्णी प्रामुख्याने उपस्थित हाेते.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.