भाजपा युवा मोर्चा भव्य किल्ला बांधणी स्पर्धा २०२१ बक्षीस वितरण समारंभ संपन्न.

इचलकरंजी : संजय आंबे

 दि ३० डिसेबर :भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्या संकल्पनेतून भव्य किल्ला बांधणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने इचलकरंजी शहरामध्ये दिवाळीपूर्वी भव्य किल्ला बांधणी स्पर्धा घेण्यात आली होती. ”शिवतिर्थ इचलकरंजी” असा या स्पर्धेचा विषय होता. इचलकरंजी शहर परिसरातील ३० स्पर्धक मंडळांनी यामध्ये सहभाग घेतला होता. भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रविण पाटील आणि सर्व पदाधिकारी प्रत्यक्षात किल्ल्यांना भेटी देऊन यांची नोंद घेतली होती. २५ डिसेंबर हा देशाचे माजी पंतप्रधान,भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून भाजपा शहर कार्यालय येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. यायध्ये प्रथम क्रमांक कुंभार ग्रुप, द्वितीय क्रमांक किसान चौक ग्रुप, तृतीय क्रमांक संतोष गागडे या मंडळांनी पटकाविले. तसेच मध्ये हिंदवी ग्रुप, जनसेवा मंडळ २१७, केशरी चौक मंडळ या मंडळांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर्व विजेता मंडळांना रोख रक्कम व गौरव शिल्ड मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

या समारंभाला इचलकरंजीचे कार्यसम्राट मा.आम.भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर,बेळगाव महापालिका भाजपा नगरसेविका सौ.दिपाली टोपगी,भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष अॅड. अनिल डाळ्या,ज्येष्ठ नेते पांडुरंग म्हातुगडे, यांना आपले मनोगत मांडले. यावेळी बेळगाव महापालिका नगरसेविका यांचा सत्कार सुरेश हाळवणकर यांच्या हस्ते करण्यात आला. तर युवा मोर्चा सरचिटणीस पदी सुजय पवार यांची निवड झाले बद्दल नगरसेविका सौ.दिपाली टोपगीयांच्या हस्ते सत्कार  करण्यात आला.

                      या कार्यक्रमास महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा सौ.अश्विनी कुबडगे भाजपा सरचिटणीस अरुण कुंभार,अरविंद शर्मा, अमर कांबळे, युवा सरचिटणीस अरविंद चौगुले,प्रमोद बचाटे, भाजपा उपाध्यक्ष अॅड.भरत जोशी, विस्तारक राजेंद्र पाटील, कोषाध्यक्ष बाळकृष्ण तोतला, लालचंद पारिख, शिवानंद रावळ, तसेच युवा पदाधिकारी मनोज तराळ,नामदेव सातपुते, प्रविण बनसोडे,हेमंत वरुटे, रविंद्र घोरपडे, साहिल सावंत, रोहित खोत, सतिष लाड,शुभम भोसले, उमेश गोरे, राहुल गागडे, इ. पदाधिकारी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.