कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. 11 जानेवारी: कोवीडच्या तिस-या लाटेचा मुकाबला करण्यासाठी 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वर्षे वयोटामध्ये कोविड लसीकरण सुरु करण्यात आले आहे. जिल्हयातील तरुण तरुणी, मुले, मुली मोठया उत्साहात लसीकरणात सहभागी होत आहेत.
10 जानेवारी 2022 हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर आणि ज्येष्ठ नागरिकांनी बुस्टर लसीची मात्रा देण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी आज जिल्हा परिषदेच्या दवाखान्यात कोवीड प्रतिबंधात्मक बुस्टर लसीची मात्रा घेतली. कोवीडच्या तिस-या लाटेचा सामना करण्यासाठी हेल्थकेअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर व 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी लवकरात लवकर कोवीड लसीची बुस्टर मात्रा घ्यावी, असे अवाहन श्री. चव्हाण यांनी केले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, उप मुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्री. जाधव, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. फारुख देसाई उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.