रोटरी प्रोबस परिवार व पतंजली योग समितीतर्फे 75 हजार सुर्यनमस्कार घालणेचा संकल्प

इचलकरंजी: विजय मकोटे
दि: १३ जानेवारी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयुष्य मंत्रालय भारत सरकार, पतंजली योग समिती व गीता परिवार या संस्थानी 1 जानेवारी ते 20 फेब्रुवारी 2022 या कालावधीमध्ये 75 हजार सूर्यनमस्कार उपक्रम राबविण्याचा संकल्प हाती घेतला आहे. यामध्ये 21 दिवस दररोज 13 सूर्यनमस्कार करण्यात येणार आहेत. त्या अंतर्गत रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लब व पतंजलि योग समिती इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लब नाकोडा नगर येथील हॉलमधे रोटरी प्रोबसचे सर्व पदाधिकारी व पतंजलि योग समितीच्या सर्व सदस्यांनी सूर्यनमस्काराचा उपक्रम राबविला.
या वेळी सूर्यनमस्कार कसे घालायचे व त्याचे फायदे याबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली.   या उपक्रमाप्रसंगी रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते, सेक्रेटरी शिवबसू खोत, डॉ. कुबेर मगदुम, अजित कोईक, सौ. हेमल सुलतानपुरे, सौ. प्राजक्ता होगाडे, वर्षा कुलकर्णी, सौ. संगिता लडगे, सौ. शैलजा सवदीमठ आदी उपस्थित होते. 
सूर्यनमस्कार उपक्रम राबविण्यासाठी पतंजलीचे विजय पोवार, सुनिल परीट, प्रकाश मोरे, सौ. सुजाता कोईक, अमृता भोपळे, सौ. रुपिता पांढरपट्टे, सुनंदा काबरा आदी योगशिक्षक व योगसाधक उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.