कोकण रेल्वे मार्गावर विद्युत इंजिनवर चालणारी पहिली पॅसेंजर गाडीचा मान दिवा- रत्नागिरी- सावंतवाडी पॅसेंजर गाडीला
संगमेश्वर:बशीर खान
कोकण रेल्वे मार्गावर दिवा- रत्नागिरी- सावंतवाडी पॅसेंजर गाडी विद्युत इंजिनवर रत्नागिरीपर्यंत प्रदूषणमुक्त पहिली पॅसेंजर गाडी गुरुवारी धावली.
एक वर्षापुर्वी विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यापासून रत्नागिरीपर्यंत केवळ मालगाड्या विद्युत इंजिनवर चालवल्या जात होत्या. गुरुवारी दिवा ते रत्नागिरी दरम्यान धावणारी पॅसेंजर गाडी विद्युत इंजिनसह धावली.विद्युत इंजिनवर चालणारी पहिली गाडी चालवण्याचा पहिला मान रत्नागिरीतील सुपुत्रांना मिळाला. गाडीचा लोको पायलट, सहाय्यक लोको पायलट तसेच गार्ड हे तिघेही रत्नागिरीचे सुपुत्र आहेत. दिवा ते रत्नागिरी दरम्यान धावणारी ही गाडी आता रोज इलेक्ट्रिक लोकोसह धावणार आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.