बेवारस स्थितीत मिळून आलेल्या दीड वर्षीय बालिका ची ओळख पटवण्यासाठी नातेवाईकांनी पुढे यावे
देवरुख पोलिस यांचे आव्हान
देवरुख प्रतिनिधी
दि27 संगमेश्वर जानेवारीतालुक्यातील पांगरी गावपऱ्या येथे सुमारे दीड वर्षीय बालिका बेवारस स्थितीत मिळून आल्याची खळबळजनक घटना मंगळवार दिनांक २५ रोजी घडली . या बालिकेला ग्रामस्थांनी पोलिसांच्या स्वाधीन केले पोलिसांनी सदर बालकास त्याच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत.
या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी देवरुख रत्ना गिरी मार्गावर पांगरी गाव वसलेला आहे. पांगरी गावचे सरपंच सुनील म्हदे हे मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायतीकडे येत असतानाच त्यांना गाव पर्या येथे जंगलमय भागात लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला. हा प्रकार त्यांनी ग्रामस्थांच्या कानावर घातला. यावेळी ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन आजूबाजूच्या भागाची पाहणी केली असता एक-दीड वर्षे बालिका दिसून आली.

याबाबतची माहिती ग्रामस्थांनी देवरूख पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन भुजबळराव, संतोष सडकर, जावेद तडवी, बापू पवार, पायल भिसे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी व पंचनामा केला. यावेळी सरपंच सुनील महादे, ग्रामसेवक अखिलेश गमरे, पोलीस पाटील श्वेता कांबळे, वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्राचे मंगेश राऊत, सोनाली चव्हाण, दिक्षा जाधव, दिनेश मुळे, गाव प्रमुख प्रभाकर तेगडे, दत्ताराम जाधव, प्रदीप म्हदे, शिवराम दुडये यांसह ग्रामस्थ, आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
स्त्री जातीचे हे बालक आहे . ग्रामस्थांना गेली चार दिवस या जंगलमय भागात लहान मूल रडण्याचा आवाज येत असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. या बालिकेला अधिक उपचारासाठी या जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याची माहिती पोलिस यंत्रणेकडून प्राप्त झाले आहे. मात्र या घटनेबाबत तमाम तालुकावासीयांनी चीड व्यक्त केली आहे. सदर मुलीच्या नातेवाईकांनी देवरुख पोलिसाशी संपर्क साधावा असे अहवाानुसार करण्यात आले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.