भाजपच्या वतीने किराणा दुकानामध्ये वाईन विक्रीला परवानगी देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध

इचलकरंजी: विजय मकोटे

    दि28 जानेवारी  भारतीय जनता पार्टी इचलकरंजी च्या वतीने आज राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैटकीत सुपर मार्केट आणि किराणा दुकानामध्ये वाईन विक्रीला परवानगीचा जो निर्णय घेतला आहे या निर्णयाविरोधात महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी तीव्र निदर्शन करण्यात आले किराणा दुकानात आणि सुपर मार्केट मध्ये अनेक महिला आणि लहान मुले येत असतात त्यामुळे याठिकाणी वाईन विक्री करणे योग्य नाही . पेट्रोल आणि डीझेल एवजी दारू स्वस्त करणारे सरकार, दारू बंदी संपवून दारू विक्रीला परवाने देण्याचा निर्णय आणि आत्ता थेट सुपर मार्केट, किराणा दुकानातून घरोघरी दारू अशा पद्धतीने महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही याचा भाजपा इचलकरंजीच्या वतीने  जाहीर निषेध करण्यात आला .

यावेळी भाजपा सरचिटणीस अरुण कुंभार, महिला आघाडी अध्यक्ष पुनम जाधव, युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण पाटील, मा नगरसेवक किसन शिंदे, महिला जिल्हा उपाध्यक्षा अश्विनी कुबडगे,  सहकार आघाडी अध्यक्ष पुष्कर उत्तुरे, उमाकांत दाभोळे, सुजय पवार, संतोष कोळी, हेमंत वरुटे संगीता साळुंखे, निर्मला मोरे, नीता भोसले, योगिता दाभोळे, मनोज तराळ , अनिता कुरणे, वंदना कांबळे, अलका विभूते, सुप्रिया मजले , मधुमती तोरगुले , ऋतुजा विभूते, सरला घोरपडे उपस्थित होते

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.