रत्नागिरी काँग्रेस तालुकाध्यक्ष पदी विकास पाटील यांची नियुक्ती

रत्नागिरी मैहरूनिसा

दि: २९ जानेवारी जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाभार अविनाश लाड यांनी स्वीकारल्यापासून जिल्हा काँग्रेस मध्ये धडाधड निर्णय घेऊन मार्ग काढण्याची शृंखला तयार होत आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. काही दिवसा पूर्वीच प्रभारी शहर अध्यक्ष पदी साईराज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचाच प्रत्यय म्हणून रत्नागिरी तालुकाध्यक्ष पदी विकास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.तसे त्यांना पत्र देऊन जिल्हाध्यक्ष अविनाश लाड साहेब यांनी जिल्हा काँग्रेस तर्फे विकास पाटील यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. तदप्रसंगी जील्हा सरचिटणीस बंडू सावंत इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.