प्रा. मोनाली बहादुरे यांना आचार्य पदवी

नागपूर:नंददत्त डेकाटे

दि. २ जानेवारी नुतन आदर्श महाविद्यालय येथे कार्यरत असलेल्या समाजशास्त्र विषयाच्या प्रा. मोनाली बहादुरे यांना नुकताच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा पीएचडी चा सन्मान प्राप्त झाला. त्यांनी महीला सशक्तीकरणाचा विवाह जोडीदार निवड व पुढील कौटुंबिक संबंधावर होणारा परिणाम एक समाजशास्त्रीय अध्ययन या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे डॉ. अशोक बोरकर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. या यशाचे व सन्मानाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. बुरडकर, सहकारी प्राध्यापक, कुटुंबिक व मित्रपरिवाराला आणि प्रकाश शिवराम बहादुरे यांना दिले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.