दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत विविध विकास कामांचे उद्घाटन
आमदार विक्रम दादा सावंत यांच्या हस्ते झाले उद्घाटन
जत:विठ्ठल हेगडे
दि: १ जानेवारी गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणून सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यात विकास कामाची गंगा आणणारे जत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.विक्रमदादा सावंत यांच्या कुशल नेतृत्व व त्यांच्या कार्य पद्धती चर्चा विधानसभेत सुध्दा होताना दिसत आहे.
जत तालुक्यातील मौजे कोसारी या अडीच ते तीन हजार लोक वस्ती च्या गावामध्ये दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत पेविंग ब्लॉक काँक्रीट रोड बंदिस्त गटार मुरूमीकरण या कामांचे उद्घाटन जत तालुक्याचे लाडके विक्रम दादा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले..
मौजे कोसारी गावचे नेते व जिल्हा परिषद शेगाव गटाचे माजी सदस्य माननीय श्रीनिवास भोसले यांनी केलेल्या प्रयत्नांने त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमावेळी जत पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब कोडग, दानम्मा देवी शेतकरी दूध उत्पादक संघ चे संचालक रावसाहेब मंगसुळी, काँग्रेस चे नेते व रामपूर गावचे माजी सरपंच मा. मारुती पवार, सामाजिक कार्यकर्ते लतीफ मणेरी, मौजे कोसरी गावचे सरपंच मा, तानाजी बिसले उपसरपंच बाळासो पवार कोसारी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.