विश्व समता कलामंच च्या वतीने माभळे गावातील कलाकारांचा विशेष गौरव
संगमेश्वर:-मुजीब खान
विश्व समता कलामंच लोवले ,संगमेश्वर जि.रत्नागिरी या सामाजिक संस्थेच्या वतीने माभळे गावातील युवाकलाकार
कुमार सचिन काष्टे, कुमारी गौरी जाधव,कुमार अविष्कार गीते यांना
प्रज्ञा गौरवपत्र व पुप्षगुच्छ देवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमाला
विश्व समता कलामंच चे मार्गदर्शक व सामाजिक कार्यकर्ते मा.दिनेश आंब्रे,
मा.मनोहर गीते, मा.शिवराम जोशी, मा.नंदू जोशी , पोलिस अधिकारी विजया तांबडे मँडम,तंटामुक्त अध्यक्ष
दिलीप गीते, बाळकृष्ण गीते बबन शिगवण, आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रम माभळे काष्टेवाडीतील येथील नवतरुण मित्र मंडळ यांनी आयोजित केलेल्या माघीगणेश उत्सव मध्ये संपन्न झाला.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.