सनदी लेखापाल (सीए) (Chartered Accountant) अंतिम परीक्षेत कडवई पाटील वाडी येथील सुकन्येचे यश
तुरळ:-सादीक नायकोडी
सनदी लेखापाल (सीए) (Chartered Accountant) अंतिम परीक्षेचा निकाल (Exam Result) जाहीर झाला आहे. डिसेंबर महिन्यात झालेल्या ‘सीए फायनल’ (नवीन पद्धत) परीक्षेत कडवई पाटील वाडी येथील सुकन्या आदिती विश्वनाथ जाधव हिने उज्वल यश संपादन केले आहे.
आदिती जाधव ही कडवई गावची आहे तसेच कल्याणचे शिवसेना उपविभागप्रमुख माननीय विश्वनाथ जाधव यांची कन्या व गणेश भक्त चंद्रकांत जाधव (दादा)यांची पुतणी आहे.या परीक्षेत एकूण एक लाख १० हजार ६६२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ३३ हजार ५१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ३०.२८ टक्के आहे.
आदिती जाधव हिने प्राप्त केलेल्या या यशामुळे कडवई परिसरातुन तिच्यावर अभिनंदन करण्यात येत आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.