महिला दिनानिमित्त श्रीमंत गंगामाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, येथे कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न
इचलकरंजी : संजय आंबे
दि. 8 मार्च :जागतिक महिला दिनानित श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आल्या.यामध्ये कबड्डी लहान गट व मोठा गट तर व्हॉलीबॉल मोठा गटाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या प्रसंगी सर्व खेळाडू विद्यार्थीनींना बक्षीस देऊ व सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस. गोंदकर मॅडम, उपमुख्याध्यापिका सौ. एस. एस. भस्मे मॅडम, पर्यवेक्षक श्री. व्ही. एन. कांबळे सर व क्रीडा शिक्षक श्री. शेखर शहा व श्री. एस. के लाड उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.