इलेक्ट्रॉनिक माध्यम हे दुधारी तलवारीसारखे आहे. त्याचा वापर विधायक कामांसाठी करावा

सांस्कृतिक व आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर

इचलकरंजी : संजय आंबे
दि. ८ मार्च :इलेक्ट्रॉनिक माध्यम हे दुधारी तलवारीसारखे आहे. त्याचा वापर विधायक कामांसाठी करावा, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक व आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.
येथील ए. के. प्रोडक्शन आणि आयसीएच 09 स्टुडीओच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री अधिकारी ब्रदर्सच टेलिव्हिजन नेटवर्क लि. मुंबईचे चिफ फायनान्स ऑफिसर सुरेश सातपुते होते. यावेळी अनंतपूर (ता. अथणी) चे सरपंच रुद्रगौडा पाटील, मुंबईचे हेमंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, ए.के. प्रोडक्शनने सामाजिक भान ठेवून काम केले आहे. नामवंत गायकांसोबत त्यांनी काम केल्यामुळे कोठेही त्यांना कमतरता भासणार नाही.  स्टुडिओच्या माध्यमातून सत्य व वस्तूनिष्ठ माहिती द्यावी.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना सुरेश सातपुते म्हणाले, सब ग्रुप आपल्या सोबत आहे. आपल्या विधायक कामाच्या मागे आम्ही सदैव राहू. तर रुद्रगौडा पाटील यांनी ए. के. प्रोडक्शनने अनंतपूर गावच्या नांवाला साजेश असे अतुलनीय काम केल्याचे सांगत शुभेच्छा दिल्या.
सुरेश सातपुते यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी ए. के. प्रोडक्शनच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक  अरुण काशिद यांनी केले. सूत्रसंचालन रोहित शिंगे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन अनिल डांगरे, विक्रम खांडेकर, ऋषिकेश ठाकुर-देसाई, राहुल निमणकर यांनी केले. कार्यक्रमास माजी आमदार सुरेश हाळवणकर, संजय गांधी निराधार योजना समिती शिरोळचे अध्यक्ष प्रकाश पाटील-टाकवडेकर, विकास कांबळे, बाळासाहेब कलागते, पुंडलिकराव जाधव, सयाजी चव्हाण, प्रकाश पुजारी, गजानन काशिद आदी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.