उमलती पृथ्वी फाऊंडेशन व निरजा फाऊंडेशन, यांच्या संयुक्त विद्यमाने बांधण्यात आलेला बंधारा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत

संगमेश्वर/साद्दीक नाईकोडी
उमलती पृथ्वी फाऊंडेशन कडवई व निरजा फाऊंडेशन, यांच्या संयुक्त विद्यमाने नदीवर बांधण्यात आलेला कडवईतील चौथा बंधारा कडवई ग्रामपंचायतीकडे आज दिनांक १४ मार्च रोजी हस्तांतरीत करण्यात आला. अनेक वर्षांपासून उमलती पृथ्वी फाऊंडेशन कडवईमार्फत संपूर्ण कडवईत अख्तर मोडक,इरफान चिकटे,साद्दीक नाईकोडी, अनीस खान,सिकंदर जुवळे,अफसर खान यांनी नदीवर बंधारे तयार करून जलसंधारणाचे काम हाती घेतले आहे.कडवईत चार बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास आले आहे व लाखो लीटर पाणी भूगर्भात साठविण्यात यश आले असून, त्याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ झालेला आहे.
या बंधारे निर्मीती कामात निरजा फाऊंडेशनच्या डॉ. गोखले,माननीय अविनाशजी अल् हिदाया संस्था सिंगापूर,माननीय अख्लाक मोडक दुबई,यांच्या कडून मोलाचे सहकार्य लाभले.आज नजीर जुवळे यांच्या घराजवळ नदीवर तयार करण्यात आलेला बंधारा गृपग्रामपंचायत कडवई यांना हस्तांतरीत करण्यात आला. यावेळी सरपंच विशाखा कुवळेकर,सर्व ग्रामपंचायत सदस्य, उमलती पृथ्वी फाऊंडेशन सदस्य साद्दीक नाईकोडी, डॉ. अन्सार जुवळे,कडवई जमात अध्यक्ष सिकंदर जुवळे,अय्याज जुवळे,साद्दीक काजी,विलास पुरोहीत,जमातुलमुस्लिमीन कडवईचे सर्व सदस्य, लिंबुकर,पोलीस पाटील तुळसणकर,ग्रामसेवक भुसारे इत्यादी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.