मैत्री क्रीडा मंडळ आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेत मानोबा माखजन संघ विजेता
कडवई :
कै. आबासाहेब सप्रे क्रीडानगरी,कडवई बाजरपेठ येथे मैत्री क्रीडा मंडळाद्वारे आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेत मानोबा माखजन या संघाने राजे लायन्स गोळवली या संघावर मात करीत विजेतेपद पटकावले.मैत्री क्रीडा मंडळाने २९ मार्च व ३० मार्च रोजी आयोजित केलेल्या या स्पर्धेचं उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.स्पर्धेमध्ये पंचक्रोशीतील व निमंत्रित असे १६ संघ सहभागी झाले होते.शेवटपर्यंत रंगतदार अवस्थेत पोचलेल्या सामन्यात मानोबा माखजनने प्रथम,राजे लायन्सने द्वितीय,मैत्री क्रीडा मंडळाने तृतीय, मोरया कुटरेने चतुर्थ पारितोषिक पटकावले.स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू तसेच उत्कृष्ट चढाईपटू पुरस्कार मानोबा माखजनच्या सोनू चव्हाण याला तर उत्कृष्ट पकडपटू पुरस्कार राजे लायन्सच्या ओमकार साळवी याला मिळाला.
या स्पर्धेला माजी सरपंच वसंत उजगावकर, माजी उपसरपंच संतोष जाधव,प्रमोद कडवईकर,डॉ ताठरे, संतोष साळुंके,कुंभार सर,किंजळकर सर,कानाल सर,बोथरे सर,मिलिंद चव्हाण,वैभव बुर्शे यांनी उपस्थिती लावली.स्पर्धेसाठी सौ.कल्पना कांबळे मॅडम,मधुकर यादव सर,राष्ट्रीय खेळाडू संजय खांडेकर,राष्ट्रीय खेळाडू युवराज गायकवाड, शांताराम कडवईकर,आशिष सरमोकादम,निलेश कुंभार सर,आर.एस.जाधव,दिलिप साळवी,बापू खातू यांचे विशेष सहकार्य लाभले.स्पर्धेचं धावतं समालोचन वाढवे गुरुजी व मिलिंद शिंदे यांनी केलं.पंच म्हणून भायाशेठ खामकर व तेजस जोयशी यांनी मोलाची भूमिका पार पाडली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मंडळाचे सचिव मिलिंद कडवईकर,उपाध्यक्ष युवराज गायकवाड,केतन ओकटे,अनिकेत यादव,मोहित पंडव,रवींद्र चांदे,विकास धामणाक,परेश धामणाक,कुंडलिक देउलकर, सुयोग मांजरेकर, गिरीश जांगली,साईराज गुरव,महेश उजगावकर,करण उजगावकर, गणेश धुळप,ताज कुवळेकर,सुजल पंडव,रुपेश दहिवलकर,किरण पाचकूडे,दिप्तेश जोशी,सुशील जोशी,मनीष पाले,आकाश पाले,विवॆक पवार,कल्पेश माने,रोहित पाचकूडे,केतन शिंदे,गणेश बाईत, साहिल मांजरेकर,पार्थ कानाल,सर्वेश सुर्वे,कमलेश पाटील यांनी विशेष मेहनत घेतली
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.