श्री आर्य चाणक्य पतसंस्थेला २ कोटी ८५ लाख ढोबळ नफा

इचलकरंजी -विजय मकोटे

दि. ५ एप्रिल आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये श्री आर्य चाणक्य पतसंस्थेने सर्व क्षेत्रात दैदिप्यमान प्रगती करून दाखविली आहे.या आर्थिक वर्षात संस्थेचा एकत्रित व्यवसाय २६३ कोटीचा झालेला आहे. संस्थेच्या आर्थिक वर्षअखेर १५५ कोटी २४ लाख ठेवी असून कर्जे १०७ कोटी ५१ लाख इतकी आहेत. संस्थेचे भाग भांडवल ८ कोटी ४५ लाख असून संस्थेचा निधी १६ कोटी ९० लाख इतका आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये संस्थेला २ कोटी ८५ लाख इतका ठोबळ नफा झालेला असून सर्व तरतुदी करून संस्थेस २ कोटी १३ लाख इतका निव्वळ नफा झालेला आहे. मागील एक वर्षापासून कोरोना विषाणूच्या थैमानाने कर्ज वसुली करण्यास अडचणी येऊन देखील संस्थेने चालू वर्षात ९६.३२% इतकी वसुली केली असून संस्थेचा निव्वळ एनपीए O% टक्के राखण्यात यश मिळाले आहे.
श्री आर्य चाणक्य सहकारी पतसंस्थेच्या सभासद ठेवीदार व हितचिंतकांनी टाकलेल्या विश्वासामुळेच संस्था प्रगतीचे टप्पे पार करीत आहे. संस्थेने अनेक ग्राहकोपयोगी कर्ज योजना सुरू केल्या आहेत. इचलकरंजी परिसरातील ग्राहकांना घर खरेदी, घर बांधकाम, फ्लॅट खरेदी यासाठी घरकुल योजना
अमलात आणलेली असून सदर योजनेत कर्जाचा व्याजदर ११% टक्के आणि मुदत १५ वर्षे आहे. सदर योजनेमध्ये बांधकाम परवाना  आवश्यक नाही तसेच कर्जमंजुरी पूर्वी कोणताही खर्च नाही. याखेरीज सोनेतारण कर्ज योजनेत ९.५% दराने कमीत कमी कागदपत्रे घेऊन त्वरित कर्ज उपलब्ध होते या कर्ज योजना ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या असून सर्वांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री जवाहर छाबडा यांनी केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.